बार्शी, ( गौडगाव ता. बार्शी ) येथील श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर लोहकरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन गुरुवारपासून छत्रपती शिवाजी बोर्डिंग गौडगाव येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने चालू झाले आहे.
गुरुवारी सकाळी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले तर प्रतिमा पूजन, जीवन लोहोकरे तर विनापूजन संस्थेचे खजिनदार मदनलाल खटोड यांच्या हस्ते झाले.
गुरुवारी पहिल्या दिवशी कीर्तनकार संतोष लहाने महाराज आळंदी ( दे ) यांचे किर्तन झाले तर शुक्रवारी गणेश बर्गे महाराज, शनिवारी अच्युत पुरी, रविवारी हनुमंत अंकुश महाराज, सोमवारी मिनल अडसूळ संभाजीनगर, मंगळवारी वामन शेळके तर बुधवारी काल्याचे कीर्तन माऊली महाराज अनसूर्डेकर यांचे कीर्तन सेवा होणार आहे असे संस्थेचे सचिव पंडितराव लोहोकरे यांनी सांगितले.
तसेच दिनांक ४ ऑगस्ट रोजी कै. कर्मवीर लोहकरे गुरुजी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गौडगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन