दि.२३, गौडगांव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव तालुका बार्शी या संस्थेचे संस्थापक परमपूज्य कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांची 35 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या पुण्यतिथी निमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री विनायकराव बप्पा गरड यांच्या हस्ते गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे सचिव पंडितराव लोहोकरे, सहसचिव अरुण भड, खजिनदार मदनलालजी खटोड, ज्येष्ठ संचालक अनिल काका गरड, वसंत त्र्यंबक काकडे व मल्टीपर्पज हायस्कूल चे प्राचार्य जीवन लोहोकरे सर्व स्टाफ कर्मवीर लोहोकरे गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य प्रियांका खटके व त्यांचा सर्व स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनीच्या उपस्थितीमध्ये हरिनामाचा जागर करत गुरुजींना ३५व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच विद्यार्थी मनोगते व संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी अ च्या मुलींनी दुर्मिळ नाण्यांचा संग्रह विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मांडण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिवराज गरड सर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख हरिनारायण राठी सर्व स्टाफ सेवक पोपट सोनवणे सुधीर भड, गोवर्धन भड, किरण सुतार संतोष दसवंत अभिमान भड सुदर्शन गरड शिवराज गरड पिंटू सुतार यांचे सहकार्य लाभले प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ