Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर

कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर

कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
मित्राला शेअर करा

चारे (ता. 23ऑगस्ट 25…) – कर्मवीर विद्यालय चारे येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेच्या अनुषंगाने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रसिद्ध चित्रकला शिक्षक श्री. लांडगे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौलिक व उपयुक्त मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शन वर्गात लांडगे सरांनी चित्रकलेतील विविध घटक, जसे की – रेषा, आकार, रंगसंगती, प्रमाण, छायाचित्रण, नैसर्गिक दृश्यांची रचना, पोर्ट्रेट रेखाटन यांचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मौलिक टिप्स दिल्या.

विद्यार्थ्यांना चित्र रेखाटताना होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळाव्यात, रेखाटन अधिक आकर्षक व जिवंत कसे दिसेल याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना येणाऱ्या परीक्षेत यश मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्राचार्य श्री हनुमंत चव्हाण सर यांनी चित्रकला शिक्षक श्री लांडगे सरांचे आभार मानताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक पातळीवर प्रोत्साहन मिळावे म्हणून अशा मार्गदर्शन वर्गांचे आयोजन गरजेचे आहे.”

या शिबिरामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग व पालक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करून आगामी परीक्षेत यश मिळवण्याचा निर्धार केला.