करमाळा येथील जीन मैदानात हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी ( ता . 19 ) आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यामध्ये इराण व पंजाब येथील पैलवान येणार आहेत, अशी माहिती पैलवान सुनील सावंत यांनी दिली आहे. पै. सावंत म्हणाले, दरवर्षी प्रमाणे यंदा ही कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यामध्ये इराणमधील चॅम्पियन पैलवान अली इराणी, पंजाबमधील पैलवान भुपेंद्रसिंग, महाराष्ट्राचा मल्ल सिंकदर शेख, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनील जाधव, सुरज निकम, विलास डाईफोडे, योगेश पवार यांच्या कुस्त्या होणार आहेत.

आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी , तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पुणेचे उद्योगपती रामभाऊ जगदाळे आदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगीरे, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतुल पाटील, कुस्ती सम्राट पै अस्लम काझी, पै. भारत वस्ताद जाधव, उपमहाराष्ट्र केसरी पै विजय मोडाळे, पै प्रवीण घुले वस्ताद तसेच अनेक महाराष्ट्र चॅम्पियन नामवंत वस्ताद यांचा तालीम संघाचे वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी कुस्ती मैदानाचे समालोचन राजाभाऊ देवकते, धनाजी मदने करणार आहेत. या कुस्तीचे मैदान यशस्वी करण्यासाठी पै. दादासाहेब इंदलकर, पै. श्रीकांत ढवळे, पै. नागेश सुर्यवंशी, नानासाहेबी मोरे, सचिन गायकवाड, विनोद महानवर, पै. पिल्लू इंदलकर, पै. गणेश दादासाहेब सावंत परिश्रम घेत आहेत.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर