Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > कशी असेल यावर्षीची 10 वी -12 वी बोर्डाची परीक्षा सविस्तर

कशी असेल यावर्षीची 10 वी -12 वी बोर्डाची परीक्षा सविस्तर

राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे त्या अनुषंगाने परीक्षेचे स्वरुप
मित्राला शेअर करा

तसेच 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च , तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार – अशी माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे

कसे असणार परीक्षेचे स्वरूप ?

जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत , ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत

विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल -१५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर त्या शाळेला उपक्रेंद मिळणार आहे

लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटे अधिक वेळ – तर ७०-१०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार

सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे ,तर विद्यार्थ्यांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार

तर दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे

७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा असणार या व्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतील शिक्षकच घेतील