आपल्या विनोदी शैलीने उपस्थितांना खिळवून ठेवून सर्वांची मने जिंकण्याचा मोठा हातखंडा असणारे ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांनी सबंध महाराष्ट्रभर वारकरी सांप्रदाय वाढवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली.
मधुकर महाराज यांनी महाराष्ट्रातील हजारो खेड्यापाड्यांमध्ये हरीकीर्तनाच्या माध्यमातून संतांच्या विचारांची पेरणी करत वारकरी सांप्रदाय मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत वृद्ध असताना आपल्या कीर्तनाने महाराष्ट्राला वेड लावणारे, वारकरी संप्रदायाचे प्रचारक, ज्येष्ठ किर्तनकार, समाज प्रबोधनकार, विनोदाचार्य मधुकर महाराज यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदाय, समस्त भक्तगण आणि गिरी गोसावी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
More Stories
तेर येथील तेरणा हायस्कूलचा 97 टक्के निकाल
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार