बार्शी:- कोरफळे येथील शेतकरी निलेश पवार त्यांच्या रानातील जनावरांच्या शेडमध्ये काल रात्री एक हरणाचे दोन-तीन दिवसापूर्वी जन्मलेले एक हरणाचे पाडस कंपाऊंडच्या जाळीमध्ये अडकलेले निदर्शनास आले.

त्यानंतर सचिन निकम यांनी त्याला त्यातून सुखरूप बाहेर काढून शेडच्या आत मध्ये नेहुन प्राथमिक उपचार करत जखमेवर हळद लावून आत मध्ये कोंडुन ठेवले व लगेच वनाधिकारी श्री. महावीर शेळके साहेब यांच्याशी संपर्क करून वनकर्मचारी मारुती जाधव व औदुंबर पवार यांच्या स्वाधीन केले यावेळी अरिफ काझी निलेश पवार उपस्थित होते.
More Stories
जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता, कृषी विभागामार्फत 1.50 लाखांचे अनुदान
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत
आज ११ वाजता बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम