आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील अनेक गावातील पीक पाहणी केली. या बाधित क्षेत्रात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी लागेल अशी परिस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली आहे.
सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक दिवसांपासून सोयाबीन पिकात पाणी साचलेले असल्याने शेंगा काळ्या होणे, बुरशी लागणे, कोंब फुटणे याला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागणार नाही, उलट काढणीचा खर्च माथी पडणार आहे.
सणासुदीच्या तोंडावर हा आर्थिक फटका अनेकांसाठी असह्य ठरणार आहे. सरकारने माणुसकीच्या नात्याने व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनुदानच नाही तर पीक विम्याची सरसकट नुकसान भरपाई देखील तातडीने जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गतवर्षीच्या पीक विम्याचा अजूनही पत्ता नाही पण किमान दिवाळीच्या आधी तरी ती रक्कम मिळायलाच हवी. अशी भावना गावोगावी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे उगवलेल्या परिस्थितीने खचून जाऊ नका असा दिलासा आमदार. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला.
आपल्या हक्काचे अनुदान व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे, आक्रमकपणे आपली भूमिका शासनदरबारी पोहोचवने गरजेच आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत असेल तर कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करावा व पोहोच घ्यावी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका दाखवणे गरजेचे आहे दौऱ्यादरम्यान तेरणा नदीकाठच्या कळंब तालुक्यातील वडगाव (ज), चोराखळी, सापणाई, उपळाई, येरमाळा, वाशी तालुक्यातील तेरखेडा तसेच उस्मानाबाद तालुक्यातील तुगाव, मुळेवाडी, तेर, वाणेवडी, कोळेवाडी, डकवाडी या नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी आमदार पाटील यांनी केली.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट