Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर

कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर

कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
मित्राला शेअर करा

आगळगाव, ता. बार्शी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धात लोकसेवा विद्यालय आगळगाव प्रशालेतील चार विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी खालील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

1) आर्यन लोंढे- 56किलो
2) विराज लंगोटे-44किलो
3) असफ मुजावर -62किलो
4) सलीम फकीर -74किलो.


या या विद्यार्थ्यांना वस्ताद अक्षय गिराम आणि क्रीडा शिक्षक एस. सी. बचुटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल ओमन, उपाध्यक्ष सागर गरड मुख्याध्यापक व्ही. बी. चौधरी सर, सरपंच पुतळाताई गरड, उपसरपंच वैभव उकिरडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.