Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
मित्राला शेअर करा

बार्शी /-
वैराग ते लाडोळे मार्गे उपळे येथे जाणारा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. लाडोळे ग्रामस्थांना मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असून नव्याने पक्का रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे.


या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, या रस्त्यावरून शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच दैनंदिन गरजांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहनांची ये-जा करणे कठीण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय शिक्षणासाठी वैराग येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे स्कूल बस सेवा बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणे आणखीच अवघड होते.अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी ग्रामस्थांची भावना आहे.


दरम्यान, ट्रॅक्टरमधून ऊसाच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. लाडोळे मार्गे जाणारा वैराग ते उपळे हा रस्ता तात्काळ कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनेतून नव्याने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे हाल थांबवावेत अशी मागणी लाडोळे येथील अशाेक गुंड यांनी केली आहे.