Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > लिओ क्लब च्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे पवन श्रीश्रीमाळ, सहा जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

लिओ क्लब च्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे पवन श्रीश्रीमाळ, सहा जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

लिओ क्लब च्या प्रांताध्यक्ष पदी बार्शीचे पवन श्रीश्रीमाळ, सहा जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी
मित्राला शेअर करा

बार्शी: लायन्स क्लबच्या अंतर्गत तरूणांसाठी कार्यरत असलेल्या लिओ क्लबच्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे पवन श्रीश्रीमाळ यांची निवड करण्यात आली. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील लिओ क्लबचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी या निमित्ताने बार्शीचे श्रीश्रीमाळ यांना मिळाली आहे.

सांगली येथे लायन्स क्लबच्या 3234 – डी 1 ची राज्यस्तरीय बैठक पार पडली. लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनिल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची यावेळी निवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे नूतन प्रांतपाल राजशेखर कापसे, उपप्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, एम. के. पाटील, अशोक मेहता, राजेंद्र कासवा, ॲड. श्रीनिवास कटकुर, ॲड. आनंद सागर हे उपस्थि होते.

मागील वर्षभरात श्रीश्रीमाळ यांच्या मागदर्शनाखाली लिओ क्लब बार्शीच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रामुख्याने पदपथावरील छोट्या विक्रेत्यांना पावसाळी छत्रीचे वाटप, चिपळूण येथील पुरग्रस्तांना मदत, महाविद्यालयीन युवतींसाठी आरोग्य रक्षणाचे साहित्य वाटप, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण करणे, स्वच्छता अभियान राबवणे, नगपरिषद कर्मचारी आरोग्य तपासणी, मतदार नोंदणी अभियान, अन्न व भेसळ विषयक मार्गदर्शन, नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, उन्हाळी टोप्यांचे वाटप, चादर वाटप, अन्नदान, निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणे हे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. याची दखल घेत लायन्स क्लबने पवन श्रीश्रीमाळ यांची निवड केली.