Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

मित्राला शेअर करा


आज दिनांक १५/१०/२०२१ वार शुक्रवार रोजी भाताचे पूर्व राष्ट्रपती व मिसाईल व सॅटेलाईट प्रक्षेपण तंत्रज्ञान विकास कार्यामध्ये महत्वाचा वाटा असणारे मिसाईल मॅन भारतीय शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभर साजरी करण्यात येते या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिन विशेष- डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा , या साठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात .

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र , पुणे मार्फत प्रसार माध्यम विभागांतर्गत आयोजित वाचन प्रेरणा दिन लाइव्ह

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत : ला समृद्ध कसा करेल आणि त्यानुसार देश कसा बलशाली होईल , असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ . अब्दुल कलाम नेहमी करीत असत . वैज्ञानिक असताना डॉ . अब्दुल कलाम यांनी १ ९९ ६ वर्षी ‘ इंडिया २०२० ‘ हे पुस्तक लिहिले . ‘ इंडिया २०२० ‘ पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने डॉ . अब्दुल कलाम यांनी व्हिजन २०२० तयार केले . नकारात्मकतेचे कारण नाही , तुम्ही सर्व काही करू शकता . कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे , हे पटवून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला . त्यासाठी डॉ . अब्दुल कलाम हे कायम मुलांमध्ये रमलेले असत . त्यातूनच डॉ . अब्दुल कलाम यांनी इंडोमिटेबल स्पीरिट हे पुस्तक लिहिले.

डॉ.अब्दुल कलाम यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत “

प्रथम कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण व विद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोज मिरगणे यांच्या हस्ते संपन्न झाले.सोबत किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा. श्रीपाद भंडारी सर, प्रा. किरण गाढवे, मुख्य लिपिक रमेश चौर ,श्री परसराम काळे, श्रीनिवास पाटील ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे मानसी काळे, श्रवण पाटील व संग्राम मोरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच शिक्षकांमधून प्रा. श्रीपाद भंडारी व प्रा. किरण गाढवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच विद्यालयाचे प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.ए.चव्हाण यांनी अध्यक्ष समारोप केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री आनंद कसबे यांनी केले.