जिल्हास्तरीय योगासन स्पर्धाचे न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाची योगपटू कु. श्रेया कैलास करळे हीने तृतीय क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. श्रेयाची शालेय योगासन स्पर्धेत पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. तसेच विद्यालयातील खालील खेळाडूंनी शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश संपादन केले.
गोळा फेक प्रथम क्रमांक कु. सना फकीर, गोळा फेक प्रथम क्रमांक चि. सागर भोसले, हॅमर थ्रो प्रथम क्रमांक चि. हुसेन शेख, थाळी फेक द्वितीय क्रमांक चि. हुसेन शेख, १०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक
चेतन देवकते, उंच उडी प्रथम क्रमांक चि. ऋषिकेश घोडके, उंच उडी द्वितीय क्रमांक कु. श्रावणी कांबळे व १०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक कु. विशाखा मते
या सर्व स्पर्धा शिवशक्ती मैदान बार्शी या ठिकाणी पार पडल्या. वरील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेले आहे
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.पी.डी पाटील, श्री.योगेश उपळकर, श्री.विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील, श्री.बी.के.भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!