दिनांक २२/०४/२०२३ वार शनिवार रोजी अमरावती येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलींचे गटातून महाराष्ट्र विद्यालय बार्शीची खेळाडू कु. आर्या उमेश पाटील हिने पुणे विभागा कडून खेळत पुणे विभागाला गोल्ड मेडल मिळवून देत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

आर्याला श्री सचिन रणदिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच अनिल पाटील, पी. डी.पाटील व योगेश उपळकर यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कु. आर्या पाटील चे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन.जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक