Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश

शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश

मित्राला शेअर करा

आज शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी येथे १४,१७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांमध्ये तालुक्यातील २४८ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १४ मुली मध्ये चौथा क्रमांक वेदिका विलास घोळवे तर पाचवा क्रमांक सृष्टी दत्तात्रय पाटील,वयोगट १४ मुलांमध्ये दुसरा क्रमांक प्रज्ज्वल प्रताप शिंदे तर तिसरा क्रमांक उदयांनद सोमनाथ दळवी, वयोगट १७ मुलांमध्ये प्रथम क्रमांक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त प्रसन्न विद्याधर जगदाळे तर *चौथा क्रमांक समर्थ बालाजी नवले, वयोगट १९ मुलींमध्ये चौथा क्रमांक समृद्धी विलास कुलकर्णी व वयोगट १९ मुलांमध्ये द्वितीय क्रमांक अनिकेत मारुती दळवी, तृतीय क्रमांक वेदांत सचिन मस्के तर चौथा क्रमांक वेदांत अनिल खोसे या एकूण १० खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली.आरबिटर,पंच म्हणून सोलापूर चे उदय वगरे सर यांनी काम पहिले
या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून श्री.अतुल नलगे यांनी काम पाहिले तर क्रीडा शिक्षक श्री.अनिल पाटील, श्री.पी.डी पाटील, श्री.योगेश उपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य श्री.बी.के.भालके ,सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य,महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.