महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सलग्न व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ, यांच्याद्वारे शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मागण्या यांचे निवेदन देण्यात आलेले होते. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती कला शिक्षक महासंघ यांच्याकडून देण्यात आली
प्रदेशाध्यक्ष माननीय दादासाहेब विनोद इंगोले व प्रदेश सरचिटणीस माननीय प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रल्हाद शिंदे, यांच्या मार्गदर्शनातून धुळे येथे व नाशिक येथे शिक्षक पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब सुनील महाले, प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष, दत्तात्रय सांगळे, व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ नाशिक जिल्हा अध्यक्ष, सचिन पगार, विभागीय संपर्कप्रमुख चंद्रशेखर सावंत, नाशिक जिल्हा सचिव भगवान तेलोरे व संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून प्रत्यक्ष निवेदन दिले व संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. त्यात अतिशय महत्वाची मागणी.
▪︎वरिष्ठ व निवड श्रेणीचा विनाअट सेवा लाभ कला शिक्षकांना मिळावा. तसेच ए.एम. वेतन श्रेणी प्राप्त कला शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती पात्र ठरवण्यात ही शैक्षणिक अहर्ता उच्च पदवी का असल्याने इतर पदवीप्राप्त अट कला शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीस नको.
▪︎प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रत्येकी एक कलाशिक्षक संगीत शिक्षक पदभरती व्हावी सध्या माध्यमिक विद्यालयांमध्ये जे कला शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागी कला शिक्षक पद भरती पुन्हा केली जावी इतर शिक्षकांना मान्यता देऊ नये. ही महत्वपूर्ण मागणी आपण केली आहे त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची गोड बातमी आपल्याला मिळणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे.
▪︎सेवा जेष्ठता यादी कसं वर्गात कला शिक्षकांना ए.एम वेतनश्रेणी मिळाल्यापासून तात्काळ सूचीतून संवर्गात घेण्यात यावे. असा निर्णय माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे त्यानुसार कार्यवाही व्हावी. अशा महत्त्वपूर्ण मागण्या संघटने मार्फत केल्या होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने अतिशय प्रामाणिकपणे राज्य स्तरावरील प्रश्न हाताळत त्यात यश मिळवले आहे. हे सर्व सुज्ञ कला शिक्षक बांधवांना माहिती आहे. कलाशिक्षकांच्या विषयासाठी प्रामाणिकपणे संघटनेमध्ये एकत्र एकसंघ राहण्यासाठी मजबूत राहावे यश आपले आहे अशी विनंती महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संस्थापक अध्यक्ष व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ प्रल्हाद साळुंके यांनी केली आहे.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान