महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासह दोन हजार डिझेल गाड्या खरेदी करण्यात येतील. तसेच डिझेलवरील पाच हजार गाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी मध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी चा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महामंडळाच्या सुमारे ९२ हजार अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता दरात वाढ करण्यास मान्यता दिली. यामुळे वेतनखर्चात सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ होईल. अधिकाऱ्यांच्या २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणा प्रस्तावासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ