आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा २०२५” या मोहीमेचा शुभारंभ १३ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यवेक्षक एस. सी. महामुनी यांच्या हस्ते ध्वजारोहण आले.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पसायदानाचे गायन केले. हर घर तिरंगा २०२५” या मोहीमेचा शेवट आज दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. डी. धावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या ध्वजारोहण प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन बी साठे, प्रा. संजय बागल, प्रा. मारूती भांडवलकर, विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी भाषण, नृत्य व कवायत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन के.जी.मदने यांनी केले.
More Stories
शिक्षक अभियोग्यता TAIT व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल
जिल्हा परिषद शाळा निपाणी ता.भूम या शाळेमधून राधिका राजेंद्र खरसडे हिचा पहिल्या प्रयत्नात एम.बी.बी.एस. प्रवेश
बार्शीतील प्रा. सुरेश लांडगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार रुपयांचे क्रीडा साहित्याची भेट