नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ,पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फौंडेशन च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी वसुंधरा महत्व या अभियानाअंतर्गत 12 वृक्षांचे रोपण करण्यात आले तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील वृक्षदूत स्नेहल गायकवाड, योगिता गवळी यांनी विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली व या महोत्सवास सुरवात करण्यात आली.
बार्शी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी एस.एस जाधव नगर पालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे,मुख्याध्यापक जी.ए. चव्हाण सर, वृक्षसंवर्धन समितीचे राणा दादा देशमुख, सचिन शिंदे, राहुल तावरे, अमितराव पाटील जाणिव फाऊंडेशनचे मामा हवालदार तसेच प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
शहरात देखील विविध शाळांमध्ये आयोजन
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वसुंधरा महोत्सवाचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बार्शी शहरातील१७ माध्यमिक विद्यालय, ३४ खाजगी प्राथमिक शाळा ,नगरपालिकेच्या सर्वच २० शाळांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. सर्व शाळांच्या मधून वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले. प्रत्येक शाळेने किमान पाच रोपे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी विविध भागांमध्ये विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, परिसरातील कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर सर्व शाळांच्या मध्ये हरित शपथ घेण्यात आली .यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात करण्यात येणार असून यामध्ये शहरातील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
यानंतर झालेल्या ओला कचरा व सुका कचरा याबद्दलचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले .विविध शाळा मधील विज्ञान शिक्षकांनी तसेच तज्ञ शिक्षकांनी ओला कचरा व सुका कचरा याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
दिवसभर शहरातील वातावरण वसुंधरामय झाले होते. या सर्व उपक्रमाबद्दल बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम यांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक ,सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्शी नगर परिषदेचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे ,पर्यवेक्षक संजय पाटील, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद,वसुंधरा अभियान समन्वयक गणेश पाटील, श्रीधर कांबळे ,प्रा. डिसले, वृक्ष संवर्धन समितीचे पदाधिकारी यांनी आपल्या सहकार्यांसह परिश्रम घेतले. अनेक ठिकाणी शहरातील अनेक नागरिक,पालक उपस्थित होते.
More Stories
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील