गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र विद्यालयात नवीन वर्षातील प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा अतिशय उत्साहात, आनंदी वातावरणात व खेळीमेळीने संपन्न झाली.

पालकांनी शाळेविषयी तसेच त्यांच्या नवीन संकल्पनेविषयी स्वतःची मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन तसेच मार्गदर्शन श्रीमती करंजकर मॅडम यांनी केले शिक्षकांमधून श्रीमती झाडे मॅडम यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा बाबतीमध्ये माहिती सांगितली, श्रीमती जाधव मॅडम यांनी विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षेच्या निकालांविषयी माहिती सांगितली व श्री. पाटील सर यांनी वर्षभरामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या सराव त्याचबरोबर शासनाच्या मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात व वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाबाबतीत मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे मॅडम यांनी पालकांना विविध शैक्षणिक बाबतीमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या शिस्त, स्वच्छता व गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी मधील मंथन परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षक श्री जाधव सर यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती साठे मॅडम, श्रीमती करंजकर मॅडम, श्रीमती झाडे मॅडम, श्रीमती जाधव मॅडम श्री. पाटील सर व श्री जाधव सर उपस्थित होते.
पालक प्रतिनिधी म्हणून श्री. जगदाळे सर, श्री राजीव ठोंगे सर तसेच श्रीमती आशा वाघमारे व श्रीमती शुभांगी सुतार यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार