बुधवार दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे शिक्षक -पालक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप मोरे व रेश्मा भोसले हे उपस्थित होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.धावणे यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षक एस.सी. महामुनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी पालक प्रतिनिधी संदीप मोरे व रेश्मा भोसले यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात पालकांनी आपले प्रश्न व आपले विचार व्यक्त केले यावर विद्यालयाकडून पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पालकांनी संस्थेने व शाळेने सुरू केलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले व काही सूचनाही केल्या.
कार्यक्रमात पुढे संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले विद्यार्थी घडवताना शिक्षकाचे योगदान खूप महत्त्वाचे असते. शिक्षकांचा विद्यार्थी घडविण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो असे ते म्हणाले. आपल्या पाल्याच्या बौद्धिक व शारीरिक सर्वांगीण विकासासाठी पालकांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे,तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे त्यांनी मत व्यक्त केले.
या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी.साठे,सर्व पालक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.जी.मदने यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका एन.बी.साठे यांनी केले.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन
प्रा. संजय पाटील यांची श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी च्या कनिष्ठ शाखेच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती