बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम हॉल याठिकाणी २१ मे रोजी इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरन स्पर्धा तसेच आठवी ते
दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील जवळपास १५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जी. ए. सर, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील काला शिक्षक एस. एम. लांडगे, एन. ए. मोहिते, दयानंद रेवडकर सर, पवन जगदाळे सर यांनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक