तेर प्रतिनिधी :- हरी खोटे धाराशिव तालुक्यातील मुळेवाडी येथे रामनवमी निमित्त दिनांक ६ ते १३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा गजर घुमणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी या सप्ताह सोहळ्यातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुळेवाडी ता धाराशिव येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या ३६ वर्षांपासून अखंडितपणे सुरू करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवत रामनवमी व हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त दिनांक ६ ते १३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सप्ताह कालावधीत दुपारी २ ते ५ या वेळेत हभप भागवताचार्य नितीन महाराज जगताप हिप्परगा यांच्या मधुर वाणीतून श्रीमंत भागवत कथेचे निरुपण तर रात्री ९ ते ११ या वेळेत दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा गजर घुमणार आहे यामध्ये ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुके, हभप दीपक महाराज बदाडे, हिंदुत्वनिष्ठ हभप सतीश महाराज कदम, रामायणाचार्य हभप नाना महाराज कदम, ह. भ. प. बालाजी महाराज बोराडे, हभप गोविंद महाराज पांगरकर, हभप कुलदीप महाराज सूर्यवंशी आदी नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तसेच रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी भागवताचार्य ह.भ. प. नितीन महाराज जगताप यांची काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे विशेष म्हणजे सप्ताह कालावधीत दररोज ग्रामस्थांच्या वतीने भाविक भक्तांसह नागरिकांना सकाळी नाष्टा दुपारी व संध्याकाळी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी सप्ताह सोहळ्यातील श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सेवेसह विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संयोजक समिती व मुळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी