महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य
बार्शी – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन याचे औचित्य साधून बार्शी येथे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन बार्शी येथे सुविधा हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आले आहे.
हे शिबिर सुविधा हॉस्पिटल , सावता परिषद, महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर अजित आव्हाड कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई , डॉक्टर सुयोग बुरगुटे, डॉ. सारंग बुरगुटे यांचे मार्गदर्शन व तपासणी लाभणार आहे. या शिबिरामध्ये पोलिस व पत्रकार यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष ठेवण्यात आला आहे, तरी बार्शी व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी केले आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर