Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महावीर कदम यांनी मिळवला सोलापूर जिल्ह्यातील पहिले टायगर मॅन होण्याचा बहूमान

महावीर कदम यांनी मिळवला सोलापूर जिल्ह्यातील पहिले टायगर मॅन होण्याचा बहूमान

महावीर कदम यांनी मिळवला सोलापूर जिल्ह्यातील पहिले टायगर मॅन होण्याचा बहूमान
मित्राला शेअर करा

3 किमी जलतरण ळ, 150 किमी सायकलिंग, 30 किमी धावणे या ट्रायथ्लॉन स्पर्धेत यश

११ तास ७ मिनिटात पार केले 183 किमीअंतर

राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा सहभाग

भारत सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या फीट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात टायगरमॅन अल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन १० व ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते बार्शीकर महावीर कदम यांनी ही स्पर्धा वैयक्तिक गटात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अशा प्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे महावीर कदम हे सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच स्पर्धक ठरले आहेत.


भारतातील सर्वात लांब अंतराची ट्रायथलॉन स्पर्धा प्रथमच नागपुरात घेण्यात आली. ३ किमी जलतरण, १५० किमी सायकलिंग आणि ३० किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरुप होते. स्पर्धक वैयक्तिकरित्या आणि टीम असे सहभागी झाले होते. शिवाय ही स्पर्धा १३ तास ४५ मिनिटात पूर्ण करण्याची अट होती. या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात महावीर कदम यांनी सहभाग नोंदविला होता. सकाळी साडेसात वाजता सुरु झालेल्या या स्पर्धेत कदम यांनी एकट्यानेच ३ किमी जलतरण, १५० किमी सायकलिंग आणि ३० किमी धावणे अवघ्या ११ तास ७ मिनिटात यशस्वीरित्यापूर्ण केले. महावीर कदम यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला महावीर कदम म्हणाले आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेचे आयोजन नागपुरात झाले ही फार मोठी बाब आहे. विविध देशात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सहभाग नोंदविणे शक्य नसते.


त्यामुळे ही संधी मॉईल आणि माईल्स एन
माईल्सचे डॉ. अमित समर्थ यांनी भारतातील
ॲथ्लिट्सला उपलब्ध करुन दिली. सकाळी ७:३० वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली, सायंकाळी ६:३७ वाजता ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. इंटरनॅशनल ७०.३ आयर्नमॅन स्पर्धेपेक्षाही या स्पर्धेचे अंतर अधिक होते. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये आयर्नमॅन गोवा स्पर्धेत सहभागी झालो होतो त्यामुळे मागील अनुभव व नियमित सरावाच्या जोरावर अशी मोठी स्पर्धा सहजरीत्या पार करू शकलो. स्पर्धेत यश मिळविण्यासाठी डॉ. अमित समर्थ, जलतरण प्रशिक्षक बाळराजे पिंगळे, आहारतज्ञ् डॉ दिव्यानी निकम यांचे मार्गदर्शन लाभले डॉ. समर्थ यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनात स्पर्धेसाठी मागील एक वर्षांपासून नियमित सराव केला. तर जलतरणाचे बारकावे बाळराजे पिंगळे यांच्याकडून मिळाले आणि सरावा दरम्यान योग्य आहाराबाबत तथा स्पर्धेदरम्यान न्युट्रीशन बाबतचे मार्गदर्शन आहारातज्ञ् दिव्यानी निकम पुणे यांच्याकडून मिळाले.स्पर्धेदरम्यान बार्शी रनर्स चे सदस्य रणजित पाटील, माणिक हजारे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बार्शी रनर्स, बार्शी सायकलिंग क्लब, तसेच आर के क्लब, हेल्थ क्लब मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच बार्शी शहरातील विविध स्तरातून महावीर कदम यांचे कोतुक होत आहे.