यामध्ये ई कचरा यासंदर्भात जनजागृती करण्यात आली ई कचरा ही समस्या आपल्याकडे जरी नवीन असली तरी याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्याप्रमाणात वाढत आहे अणि भविष्यात ही समस्या मोठे स्वरुप धारण करणार हे नक्की आहे.
त्यामुळे या समस्येवर आत्ता पासूनच लोकांमध्ये जागृती निर्माण झाली तर आज इतर प्रदूषण समस्या प्रमाणे आपल्या नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत या हेतूने संपूर्ण बार्शी मध्ये प्रत्येक चौका चौकात पथनाट्य स्वरूपाने हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम “बार्शी नगर परिषदेच्या” अंतर्गत करण्यात आला असून. श्री. श्रीधर कांबळे सर यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला असून. याच जनजागृती उपक्रमाचे संपूर्ण सूत्र रोहित देशमुख यांनी सांभाळी. पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन रोहित देशमुख यांनी केले असून निवेदकाचे देखील काम त्यांनी केले. तसेच संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात श्रावण बोराडे, श्रीनिवास कुलकर्णी, अक्षय सपकाळ तसेच सिल्व्हर जुबली शाळेचे काही विद्यार्थी देखील सामील झाले.
श्रीशिवजी कॉलेज बार्शी च्या प्रांगणात याची सुरुवात झाली असून संपूर्ण बार्शी चे प्रत्येक चौक करत शेवटी कॅन्सर हॉस्पिटल चौकात याचा शेवट करण्यात आला. या मध्ये “ई कचरा म्हणजे काय, तो कसा तयार होतो, त्याचे दुष्परिणाम व त्याला रोखण्याचे उपाय असे मुद्दे अगदी सोप्या शब्दात नागरिकांना समजावून सांगितले आहेत.
More Stories
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद