Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > माझी वसुंधरा मनपा सोलापूर व MH13BE आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

माझी वसुंधरा मनपा सोलापूर व MH13BE आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

माझी वसुंधरा मनपा सोलापूर व MH13BE आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
मित्राला शेअर करा

माझी वसुंधरा सोलापूर महानरपालिका MH13BE विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिरात रविवारी दि. 18 जुलै रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.

https://www.instagram.com/p/CgHWXUcLezX/?igshid=YmMyMTA2M2Y=

ही स्पर्धा मा. सचिन खरात ह्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली गेली होती. मा. सचिन खरात हे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय चित्रकार व सोलापूर महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. सोहळ्याला, मनपा उपायुक्त मच्छीन्द्र घोळप, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय उद्योगपती मा. किशोर चंडक, डायरेक्टर ऑफ DCAS degree college of fine arts मा. अजय निनावे, DCAS चे संचालक आसिफ यत्नाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सचिन खरात यांच्या प्रस्ताविकाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मनोगत झाले. त्यांनी कार्यक्रमाबद्दल व चित्रकलेबद्दल आपले मनोगत तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात परीक्षक असणाऱ्या मा. सतीश पोतदार, मा. तेजस्वी सोनवणे, मा. श्रीगुरु ढवणे यांचा सत्कार झाला. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सहयोगी संयोजक अजिंक्य वाघमारे, ऐश्व सोनकांबळे, निखिल जंगरे , दिनेश उंबरजे व mh13 be team चे धनराज बगले, ओंकार उटगी, योगेश कोकणे, अद्वैत कुलकर्णी, सुलेमान काडी व मान्यवर शिक्षकवृंद यांचा सत्कार करण्यात आला. यापुढे बक्षीस वितरण झाले. पहिल्या गटात स्मिता निकले, समृद्धी मैती, अनुराग करपे, मृण्मयी गायकवाड, राधा कलशेट्टी, वरद डोईजड, अनुराग भोसले, शौर्य शिंदे, श्रिया देशपांडे, अपूर्व ओझा, वेदार्थ धर्माधिकारी, आराध्या हुपरे यांनी बक्षिसे मिळवली. दुसऱ्या गटात तनुश्री जगधाने, ऐमन वजीद, अक्षय चौगुले, अथर्व बिराजदार, पूर्वा नागतिळक, अन्वीता राजगुरू, विश्व येमुल, वेद बलदवा, प्राची कालखंडकर यांनी बक्षिसे मिळवली. तसेच तिसऱ्या गटातून शैलजा दारा, सार्थकी चिलबेरि, दीपक चड्डे, ऐश्वर्य चव्हाण, तनिष्का कुंभारे, सागर अराळे, प्रणिता संकपाळ, अभिजित पाटील, प्राची वाले यांनी बक्षिसे मिळवली. याखेरीज विशेष पारितोषिके स्वरूपानंद भोसले, प्रवीण सुरवसे, समर्थ सातपुते, सया मुलानी यांना मिळाली पारितोषिक वितरण झाल्यावर bfa म्हणजे batchlor of fine arts या course ची माहिती दिली गेली. BFA च्या विश्वातल्या संधी आणि उपलब्धी यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाची सांगता शिक्षकांच्या आभारप्रदर्शनाने झाली. त्यांनी त्यांच्या मनोगत व आभार व्यक्त केले, व कार्यक्रम संपन्न झाला.