महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार राजाभाऊ राऊत यांनी, उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांना, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतीपंपाचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत ईमेल द्वारे पत्र पाठवून, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली आहे.

यावर जर यशस्वी तोडगा निघाला नाही तर, बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, आघाडी सरकारच्या विरोधात अधिवेशन काळात बार्शीत भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून, तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांचे वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश करण्याची विनंती आमदार राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल