Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न

बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न

बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न
मित्राला शेअर करा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विज्ञानशुद्ध मार्गदर्शन करणारे मनशक्ती प्रयोगकेंद्र मुंबई-पुणे रोड, लोणावळा यांच्या वतीने रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी १२ वर्षावरील विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्यप्राप्ती रोगमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मातृमंदीर, ढगे मळा, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेत

  • आजार बरा होण्यासाठी सोपे व विनामूल्य उपाय
  • ताण, नैराश्य, अशांती अशा समस्यांपासून मुक्ती
  • शारीरिक, मानसिक आरोग्य
  • मन अधिक शांत, खंबीर होईल
  • रेसिप्रोपॅथीने रोगमुक्ती, दुःखमुक्ती
  • वेदना सुसह्य कशा होतील
  • आजाराबरोबर निर्माण होणारे अन्य प्रश्न
  • रोगमुक्ती व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग
  • कार्यक्षमता वाढ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

बार्शी येथे आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा तरुण, प्रौढ, ज्येष्ठ, मुलांच्या आरोग्याची काळजी घेणारे पालक, मानसिक ताण असणाऱ्या व्यक्ती, बौद्धिक क्षमता वाढवू इच्छिणारे विद्यार्थी, गर्भवती भगिनी, अपत्यप्राप्तीची इच्छा असणारे पति पत्नी यांच्यासह सर्वांनाच उपयुक्त ठरणारे होते.

ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. दत्तात्रय तिकटे,
श्री. सुरेश महामुनी, श्री. व्यंकटेश तवले, श्री. आबासाहेब घावटे, श्री. कमलाकर पाटील, श्रीमती कृष्णाली खर्डेकर, श्री. राजेंद्र कासार, श्रीमती विद्या मिरगणे, श्री. किरणकुमार खर्डेकर, श्री. रमेश गिरी, श्री. सुरज राऊत, श्री. अशोक कदम, श्रीमती अंजली गोरे ईत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले.