Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके

मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके

मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके
मित्राला शेअर करा

बार्शी – मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मराठा सेवा संघाच्या बार्शीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, मराठा सेवा संघ बार्शी तालुका अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. कल्याण घळके आणि सह सचिवपदी सोनल चोबे यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.जी. के. देशमूख यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या. यावेळी, बार्शीतील पदाधिकारी प्रा. किरण गाढवे सूरज ढमढेरे, रावसाहेब यादव, संभाजी घाडगे, विनायक घोडके, महेश देशमूख, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासह, मराठा उद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर मराठा सेवा संघ आक्रमक आणि शांततेने आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे, नवीन पदाधिकारी यांनीही त्याच भूमिकेतून कार्य करणार असल्याचे यावेळी म्हटले. दरम्यान, सर्व नवीन पदाधिकारी यांचा मराठा सेवा संघातर्फे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.