बार्शी : थोर महापुरुषांची जयंती उत्सव म्हटलं की तिथे अनावश्यक खर्च केला जातो. मोठी मिरवणूक न काढता अण्णाभाऊ साठे नगर मधील एबीएस ग्रुपच्या तरुणांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचा देशाबद्दल जाज्वल्य अभिमानाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पूर्णाकृती उत्सव मूर्तीची उभारणी केली.
या मूर्तीमुळे स्त्री शिक्षणासाठी धडपडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या काळात समाजकंटकानी त्रास दिल्यानंतर त्यांच्या मागे खंबीर उभे राहणाऱ्या लहुजींचा विचार सध्याच्या युवकांमध्ये ऊर्जा मिळवून देतो. त्यासाठीच ही मूर्ती साकारल्याचे मनोगत उत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव काकडे आणि उपाध्यक्ष अक्षय साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केले.
नऊ फुट उंचीचे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे हे पूर्णाकृती शिल्प बार्शीतील शिल्पकार पांडुरंग फपाळ यांनी बनवले आहे.
लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत नगरपालिकेसमोर झालेल्या कार्यक्रमात या मूर्तीचे अनावरण मुंबईचे निवृत्त पोलीस निरीक्षक एन. एस. पाटोळे यांच्या हस्ते तर बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, माजी बांधकाम समिती ज्योतिर्लिंग कसबे, पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, आरोग्य विभागाचे प्रमुख शब्बीर वस्ताद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास बाबा साळुंखे, कैलास काकडे, शाम शेंडगे, दलित महासंघाचे शहराध्यक्ष संदीप अलाट, जिल्हा उपाध्यक्ष निलेश खुडे, भिम टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर वाघमारे, दयावान कदम, राहुल बोकेफोडे, सामाजिक कार्यकर्ते अजित कांबळे, एडवोकेट अमोल अलाट, अविनाश गायकवाड, उषा पवार, तानाजी बोकेफोडे, कन्हैया पेटाडे, ओंकार पेटाडे, सचिव तुषार कांबळे, सहसचिव अनिकेत शेंडगे, खजिनदार चैतन्य पवार, सत्यजित खलसे, बाबा शेंडगे, कुमार शेंडगे, सुरज काकडे, सुरज शेंडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी जयंती निमित्त लाडू आणि पेढ्याचे वाटप करण्यात आले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद