Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मातृभूमी सेवा मंडळाच्या रोप्यमहोत्सवी वर्षा(२५वा वर्धापन दिन) निमित्त कोविड योध्यांचा सन्मान

मातृभूमी सेवा मंडळाच्या रोप्यमहोत्सवी वर्षा(२५वा वर्धापन दिन) निमित्त कोविड योध्यांचा सन्मान

मित्राला शेअर करा

मातृभूमी सेवा मंडळाच्या रोप्यमहोत्सवी वर्षा(२५वा वर्धापन दिन) या निमित्ताने मंडळाच्या कार्यालयात सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अविनाश डोईफोडे सर मार्गदर्शक समितीचे कालिदास नान्नजकर, सुरेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थिती होते.

यावेळी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्या बदल श्री. भगवंत कोविड सेंटरचे डॉ. योगेश कुलकर्णी, संघर्ष पवार,वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष श्री. योगेश लोखंडे, अभिषेक काकडे जगदाळे मामा हॉस्पिटलचे विक्रांत यादव,उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल श्री.ऋषीकांत पाटील, श्री. बाबासाहेब बरकुल, अमोल फुले आदींचा सन्मान मंडळाकडून करण्यात आला.


यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. किरण नान्नजकर यांनी प्रस्तावना करताना मंडळाच्या मागील कार्याचा आढावा घेताना
मंडळाकडून श्री.संकट मोचन हनुमान प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंती, गणेशोत्सव, हनुमान जयंती, या निमित्ताने अन्नदान,बालकाच्या स्पर्धा घेणे असले, उधोग व रोजगार मंडळाच्या माध्यमातून तरुणांना उधोगासाठी कर्ज उपलब्धी, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार, उन्हाळ्यात २० कलमी कार्यक्रमा अंतर्गत पाणपोई, पक्षासाठी चारा पाण्याची सोय, इत्यादी समाज उपयोगी कार्याबद्दल माहिती दिली.
शौर्य गाथा न्युजच्या माध्यमातून माध्यमे क्षेत्रातील भरीव काम असेल, उत्पादक गटाच्या माध्यमातून तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण असेल, कोवोडच्या काळातील रुग्णसेवेची भरीव कामगिरी, शासनाच्या विविध योजनांची समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहोचविणे असेल, मंडळाच्या २० कलमी कार्यक्रमाचा समावेश सोलापूर येथील हि. न. पुल्ली कन्या प्रशाला, सोलापूर यांनीआपल्या पर्यावरण या विषयात समावेश करून घेतला या बद्दल श्री.सागर गायकवाड सर याचे विशेष आभार मानण्यात आले.तसेच मंडळाच्या चालू कार्याची माहिती दिली व पुढील योजनांची महिती दिली या वेळी मंडळाकडून राजमाता जिजाऊ जन आरोग्य योजने वरती कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.


अध्यक्षीय भाषणात श्री. अविनाश डोईफोडे यांनी प्रसिद्धी पासून दूर राहून सातत्यापूर्ण कार्य ही मंडळाची ओळख असल्याचे सांगितले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद कानडे, सागर माने, अक्षय काटकर, अक्षय अंबुरे, सुनील निकम, अजय हाके, सागर सालसकर, हृषीकेश सालसकर, महादेव बेताळे, सचिन पतंगे, कमलेश जगदाळे, अभिजित म्हेत्रे, प्रशांत कुलकर्णी, दीपक राऊत, रामचंद्र चाटी
आदींनी परिश्रम घेतले.