*देगाव मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पुष्प देऊन आनंद व उत्साहाने स्वागत
*येथील मुलींच्या शाळेत आज पासून पहिल्या वर्गात 25 विद्यार्थिनीनी प्रवेश घेऊन शाळेला उपस्थित राहिल्या

*आजपासून जिल्ह्यातील चार हजार 32 शाळा सुरू झाल्या, सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे खूप उत्साहाने पुष्प व पुष्पांची उधळण करून स्वागत केले
सोलापूर, :- येथील शाळेमध्ये 25 विद्यार्थिनी नव्याने पहिल्या वर्गात प्रवेश घेत आहेत, त्यांच्यासाठी तर हा आज खूप खास दिवस आहे. अशा विद्यार्थिनींचा आनंद उत्साह वाढवण्यासाठी शाळेने खूप चांगली तयारी केलेली आहे. सर्व विद्यार्थिनींनी शाळेचा आनंद घ्यावा शिक्षक वर्ग अभ्यास करून घेतीलच परंतु आपण परस्परात मैत्रीचे नाते तयार करावे. शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षितता व संरक्षणाची जबाबदारी ही शाळेची असून येथील शिक्षक वर्गांनी आपल्या पाल्याप्रमाणे विद्यार्थिनीला संस्कार द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या देगाव येथील मुलींच्या शाळेत आयोजित शाळेच्या पहिला दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिक्षक वर्गाने जे विविध विषयाचे ज्ञान देतील ते आत्मसात केले पाहिजे. सर्वच विषयात विशेषता इंग्रजी, गणित व विज्ञान शाखेत अधिक प्राविण्य मिळवावे. येथील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पाल्याप्रमाणे शिक्षण व संस्कार द्यावेत. तसेच शाळेमध्ये तक्रारपेटी ठेवून त्यात आलेल्या तक्रारीवर कार्यवाही केली पाहिजे. विद्यार्थ्यांना खूप चांगले शैक्षणिक वातावरण येथे निर्माण करून देण्याबाबत शाळेने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सुचित केले.
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेण्याबरोबरच आई-वडील व शिक्षक वर्गांचा आदर करण्यास शिकले पाहिजे. इतर विद्यार्थ्यांसोबत चांगली मैत्री केली पाहिजे. आज मी या शाळेत आलेलो असून पुढील 25 वर्षांनी या शाळेतील विद्यार्थिनी आपले ध्येय गाठून मोठ्या पदावर जाऊन जेव्हा माझी भेट होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या आठवणी मला सांगाव्यात असेही आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी करून त्यांच्या प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या दार्जिलिंग येथील शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण ही सांगितली.
देगाव येथील 25 विद्यार्थिनी आज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेत असून त्यांचा शालेय जीवनाचा हा पहिला दिवस होता त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये जिल्हाधिकारी स्वतः आपल्या शाळेत येऊन आपले स्वागत करत असल्याबद्दल खूप आनंद व उत्साह होता.
पहिल्या वर्गाच्या या सर्व विद्यार्थ्यांनी सोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळेच्या मैदानात खाली बसून संवाद साधला. व त्यांच्यात खूप उत्साह व आनंद निर्माण केला.
प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रास्तावित केले. तसेच जिल्हा परिषदेची या शाळेची माहिती देऊन आजचा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवसाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
*चार हजार 32 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा –
यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाचा आजचा हा पहिला दिवस होता. जिल्हा परिषदेच्या 2773 शाळा व इतर बाराशे 59 शाळा अशा चार हजार 32 शाळांमध्ये खूप उत्साह आनंदाने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूर शहर व अन्य ठिकाणी सर्व शाळांमधील शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच एवढ्या मोठ्या उत्साहाने सर्व ठिकाणच्या शाळा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहून पालक वर्गामध्ये ही आनंद होता.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न