Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मुंबई सोलापूर वंदे एक्स्प्रेसला मान्यता; देवेंद्र फडणवीस

मुंबई सोलापूर वंदे एक्स्प्रेसला मान्यता; देवेंद्र फडणवीस

मुंबई सोलापूर वंदे एक्स्प्रेसला मान्यता; देवेंद्र फडणवीस
मित्राला शेअर करा

रेल मंत्रालय द्वारा देशात विविध भागात वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय द्वारा घेण्यात आलेला आहे.

सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी हजारो प्रवासी शिक्षण, व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात.

मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू झाल्याने मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार असून, त्यामुळे ही फार मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंतीवरून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांनी देखील वंदेभारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर चालवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यास सहमती दर्शवली आहे. सोलापूर भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी आणि माढा लोकसभा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी या रेल्वे सुविधेसाठी विनंती केली होती.

नाशिक-पुणे हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचा आढावा आणि चर्चा करताना ‘रेल कम रोड’ पर्यायाची आखणी करता येईल, या पर्यायाबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच राज्य सरकारशी संवाद साधणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.