बार्शी गावचे सुपुत्र धाराशिव जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांची शिक्षण उपसंचालक, पुणे विभागाच्या शिक्षण निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल मांडेगाव ग्रामस्थातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्यावतीने मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ भेट देऊन मिरगणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक विलास मिरगणे बोलताना म्हणाले, रावसाहेब मिरगणे यांनी मांडेगाव सारख्या ग्रामीण भागातून सुरू केलेला प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. ते पुढे स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले ग्रामीण भागातील युवकांनी परिस्थितीची जाण, अचूक ध्येय, जिद्द, चिकाटी समोर ठेवून मार्गक्रमण केल्यास यश हमखास मिळते हे रावसाहेब मिरगणे यांनी दाखवून दिले आहे. सत्काराला उत्तर देताना रावसाहेब मिरगणे म्हणाले, जन्मभूमीत ग्रामस्थांनी केलेला सत्कार मला उत्तम व आदर्श कार्य करण्यासाठी यापुढे नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे.
यप्रसंगी अंकुश मिरगणे, रवी मिरगणे, बबन मिरगणे, विलास मिरगणे, उपसरपंच बबन मिरगणे, पिंटू मिरगणे, हभप मच्छिंद्र पायघन महाराज, भारत मिरगणे, दत्तात्रय मिरगणे, काका मिरगणे, तानाजी मिरगणे, मिठु बाबा मिरगणे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास मिरगणे यांनी केले. सूत्रसंचालन भारत मिरगणे यांनी तर आभार तानाजी मिरगणे यांनी मानले.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी