महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2022 नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या असून या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधे महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील
▪︎ विश्वजीत जगदाळे
▪︎ हर्षराज जगदाळे
▪︎ टिना डंबरे
▪︎ श्रीनिधी खुर्द
या विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रशालेचे क्रिडा शिक्षक श्री रेवडकर सर, ए. वाय पाटील सर, पी. डी. पाटील सर, गणेश माने सर, क्रिडा मार्गदर्शक व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू शिवराज बारंगुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्री. एस. एम. लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जी.ए. चव्हाण सर, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर यांनी या सर्व खेळाडूंचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले.
More Stories
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न