आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय बाल परिषद 2022 ऑनलाईन पार पडली. यासाठी एकुण 375 विद्यार्थी व 175 शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.
सदर बाल परिषदेस ऑनलाईन स्वरूपात (VC) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री.अजित दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आज सम्पूर्ण भारत देशात २८.६ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत तर आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६. ६ टक्के आहे . मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१ टक्के युवक ( १३ ते १५ वयोगट ) हे तंबाखूचे सेवन करत आहेत आणि आपल्यासाठी हि चिंतेची बाब आहे या बाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र संचालक श्री . दिनकर टेमकर, आरोग्य विभाग सह संचालक. डॉ. पद्मजा जोगेवार, आरोग्य विभाग सह संचालक राजस्थान डॉ. एस. एन. ढोलपुरीया, एफ.डी ए. विभाग सह आयुक्त श्री. शशिकांत केकरे. राज्य कार्यक्रम अधिकारी उत्तराखंड डॉ . अर्चना ओझा, पोलीस उपायुक्त श्री . विजयकांत सागर, राज्य सल्लागार श्री . सतीश त्रिपाठी, लोकशाही चॅनल एडिटर विशाल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या बाल परिषदेचे आयोजन सलाम मुंबई फाऊंडेशन यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र विद्यालय बार्शी मधील 8 वी ची विद्यार्थिनी कु.आदिती संतोष देशमुख या विद्यार्थिनीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले व श्री.संग्राम देशमुख सर बालपरिषदेस ऑनलाईन उपस्थित होते.
याबद्दल विद्यार्थिनीचे श्री. शि.शि.प्र.मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जी.ए.चव्हाण सर, श्री.सपताळे सर यांनी अभिनंदन केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर