Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > नीरज चोप्रा , रवी दहिया आणि मिताली राजला मिळणार खेलरत्न; आणखी कोणाला मिळाले पुरस्कार

नीरज चोप्रा , रवी दहिया आणि मिताली राजला मिळणार खेलरत्न; आणखी कोणाला मिळाले पुरस्कार

मित्राला शेअर करा

भारताचा ‘Olympic Gold meddle winner म्हणजेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालेफेकपटू नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया, महिला क्रिकेटपटू मिताली राज, हॉकीपटू पी.श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीची बुधवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली.

मिताली राज

भारतीय खेळाडू नीरज चोप्रा, रवी दहिया आणि लोव्हलिना बोरगोहेन यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नीरज चोप्रा, रवी दहिया, लवलिना बोरगोहेन, पीआर श्रीजेश, अवनी लेखरा, सुमित अंतील, प्रमोद भगत, कृष्णा नगर, मनीष नरवाल, मिताली राज, यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणि सुनील छेत्री. याशिवाय 35 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात योगेश कथुनिया, निषाद कुमार, प्रवीण कुमार, सुहास यथीराज, सिंगराज अधना, भावना पटेल, हरविंदर सिंग आणि शरद कुमार यांचा समावेश आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या सर्व पुरुष हॉकी इंडिया संघाला सन्मानित करण्यात आले आहे.

हॉकी संघातील अर्जुन पुरस्कार विजेते : हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, सुमित, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, आणि मनदीप सिंग. राधाकृष्ण नायर, टीपी ओसेफ, संदीप सांगवान आदींना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.