निलेश पवार हे बार्शी शहरातील राजकीय तसेच सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. त्यांची कन्या अबोली हिच्या जन्मानंतर त्यांनी एक संकल्प केला होता कि तिचा प्रत्येक वाढदिवस तिच्या आयुष्यभर लक्षात राहील असा साजरा करणार आणि आजही अबोलीची वाढदिवस असाच साजरा केला.

आपण समाजभान जपुन मुलांना आनंद होईल असं काहीही करू शकतो
आज अबोली (चिऊताई) हिच्या इच्छे नुसार प्रथम घटक चाचणी परीक्षा चालू होणार आहे आणि चॉकलेट वाटायला मी काय आता लहान नाही बाबा मला चांगले काहीतरी घेऊन द्या मग तिनेच कल्पना सुचवली आणि ती त्यांनी फक्त अंमलात आणली
आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वर्गातील सर्व मुलामुलींना परिक्षेत उपयोग येईल असे पॅड भेट दिले आणि तीचा वाढदिवस साजरा केला
प्राचार्य मा स्वामीराव हिरोळीकर, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामचंद्र इकारे,ज्येष्ठ क्रीडाशिक्षक समीर वायकुळे सर,प्रमोद माळी सर, वर्गशिक्षिका सौ नागटिळक मॅडम ,नंदू सोनवणे सर सर्व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग यांचे त्यांनी आभार मानले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल