श्री.गणेश बळीराम काळे (कुंभार)निपाणी ता.भूम जि.धाराशिव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी औरंगाबाद ग्रामीण पोलीस येथे नवनियुक्ती झाली.
त्याबद्दल त्यांचा व आईवडील यांचा सत्कार त्यांच्या रहात्या घरी जाऊन करण्यात आला. तसेच त्याचे अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र धाराशिव)तथा जिल्हाध्यक्ष विश्व मराठा संघ महाराष्ट्र (धाराशिव) व विजयकुमार कोकाटे सर गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती भूम आणि उमेश कोकाटे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
अशा ग्रामीण भागातील आईवडील यांनी आपली परिस्थिती हलाखीची असली तरी प्रयत्न कष्ट करून आणि मुलांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थी मोठया पदावर अधिकारी होतात असे दाखवून देत गणेश व त्यांच्या आईवडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक आदर्श दाखवून दिला.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर