काय आहे नेमके प्रकरण
मयत प्रकाश उर्फ आप्पा हरिभाऊ लोंढे रा.उरुळी कांचन यांचा भाऊ विलास उर्फ भाऊ लोंढे यांचा २००२ साली खून झाला होता. या खुना मध्ये मयत आप्पा लोंढे यांनी साक्ष दिल्या मुळे गोरख कानकाटे व त्यांचे साथीदार यांना शिक्षा झाली होती. त्यामध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून ते जामिनावर बाहेर आल्या नंतर ते मयत आप्पा लोंढे यांच्या विरोधात चिडून व पाळत ठेऊन होते.
दि. २८/०५/२०१५ रोजी सकाळी ५.१५ वा. सुमारास मयत आप्पा लोंढे हे व्यायामा करिता बाहेर पडले असता त्यांचा उरुळी कांचन, शिंदवणे रोड वर गोळीबार करून धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यासंदर्भात त्यांचा मुलगा वैभव लोंढे याने लोणी काळभोर पो. स्टे. येथे अज्ञात इसमांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर तपासा दरम्यान १५ आरोपींना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती.
त्या नंतर त्यांच्या वरती मोक्का अंतर्गत कारवाई करत तपास हा DYSP राजेंद्र मोटे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. या मध्ये तपास पूर्ण करून एकूण पंधरा आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र तयार करण्यात आले होते.
त्यापैकी आरोपी १) संतोष भीमराव शिंदे, २) निलेश खंडू सोलनकर, 3) राजेंद्र विजय गायकवाड, ४) आकाश सुनील महाडिक, ५) विष्णू यशवंत जाधव, ६) नागेश लक्ष्मण झाडकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावन्यात आली आहे.
तसेच १) गोरख बबन कानकाटे,२) नितीन महादेव मोगल, 3) मनीकुमार चंद्रा उर्फ अण्णा, ४) विकास प्रभाकर यादव, ५) अण्णा उर्फ बबड्या उर्फ किसान गवारी, ६) प्रमोद उर्फ बाप्पू काळूराम कांचन, ७) सोमनाथ काळूराम कांचन, ८) रवींद्र शंकर गायकवाड, आणि ९) प्रवीण मारुती कांचन यांना या गुन्ह्यातगुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले
या पैकी सहा आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने खून व खुनाचा कट या कलम अंतर्गत दोषी ठरवून दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच इतर ९ आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे.
या मध्ये निर्दोष मुक्त केलेल्या आरोपी तर्फे ॲड. सचिन झालटे-पाटील, ॲड. अमित यादव, ॲड नंदू फडके, ॲड बाळासाहेब खोपडे, ॲड विपुल दुशिंग, ॲड प्रतिभा पवार यांनी काम पाहिले. तसेच फिर्यादी तर्फे विशेष सरकारी वकील ॲड व्ही. एम शहा यांनी काम पहिले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद