Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > ओमीक्रॉन साठी टाटाचे स्वदेशी टेस्टिंग किट, ICMR ने दिली मान्यता

ओमीक्रॉन साठी टाटाचे स्वदेशी टेस्टिंग किट, ICMR ने दिली मान्यता

मित्राला शेअर करा

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सने ओमीश्योर (Tata Medical and Diagnostics and is named OmiSure) नावाची टेस्ट किट विकसित केली असून, या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता मिळाली आहे.

यामुळे कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron Testing Kit) टेस्टसाठी परदेशी कंपनीवरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे. या किटमुळे ओमिक्रॉनचे निदान त्वरित होण्यास मदत होणार असून रूग्णांवर त्वरित करता येणार आहेत. सध्या भारतात अमेरिकन कंपनी थर्मो फिशरचे (Thermo Fisher) टेस्टिंग किट ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी वापरले जात आहे.

(ICMR Approved Kit To Detect Omicron)
ICMR ने गेल्या महिन्यात SARS-CoV-2 ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) शोधणार्‍या रिअल-टाइम RT-PCR चाचणीसाठी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी कंपन्यांकडून विविध पर्याय मागविले होते. तसेच 17 डिसेंबर रोजी या नवीन तंत्रज्ञानावर आधारित RT-PCR चाचणी किटच्या विकासासाठी आणि व्यापारीकरणासाठी कंपन्यांकडून निविदाही मागवण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानाची मालकी ICMR कडे असेल, तर टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्स हे व्यावसायिकरित्या उत्पादन करणार आहे.

टाटा ग्रुप कंपन्यांनी कोविड विरुद्ध लढ्यात आतापर्यंत 2,500 कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसऱ्या लाटेत टाटा स्टीलच्या (Tata Group Work In Covid waves ) कलिंगनगर प्लांटमध्ये ऑक्सिजनची (Oxygen Supply During Covid 19) कमतरता असताना मोठ्या प्रमाणावर द्रव ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय टाटा समूहाच्या कंपन्यांनी आजपर्यंत लाखो पीपीई किट तसेच टेस्टिंग किटचादेखील पुरवठा केला आहे.