बार्शी:- आज बार्शी शहरामध्ये तहसील कार्यालयात माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन बँक कर्मचारी समन्वय समिती बार्शीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अपुरी कर्मचारी संख्या, विविध प्रकारच्या शासकीय योजनांची बँकांमार्फत होणारी अंमलबजावणी, त्याचा कर्मचाऱ्यावर पडणारा ताण, स्टाफवर होणारे हल्ले, सुरक्षेचा प्रश्न, सध्या लाडकी बहीण योजना राबवत असताना निर्माण होत असलेले प्रश्न इत्यादी विषयांचा त्यात समावेश केला होता .
यावर प्रतिक्रिया देताना “बँकांमधील होणारी तुटपुंजी नियुक्ती आणि बँकावरचा ताण ही अत्यंत गंभीर बाब असून यावर वित्तमंत्री मा. निर्मला सीतारामन यांच्याशी यापूर्वीही चर्चा झाली असून अजूनही तो विषय लावून धरणार आहोत. त्याचबरोबर संघटना म्हणून तुम्हीपण तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्या त्याला आमचा पाठिंबा असेल, यावर आपण मिळून नक्की तोडगा काढू” या शब्दात त्यांनी आश्वासन दिले .
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष कॉ. राहुल मांजरे सचिव कॉ. सरिता कुलकर्णी आणि अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते .
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ