युवासेना विद्यापीठ कक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील प्रभारी कुलगुरू यांना विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांसंदर्भात चांगलेच धारेवर धरले
काय आहेत युवासेना विद्यापीठ कक्षाच्या मागण्या
1) सोलापूर विद्यापीठाअंतर्गत ऑक्टोंबर/ नोव्हेंबर प्रथम सत्रातील परीक्षा घेण्यात आल्या होत्या, सदर परीक्षेचे निकाल हे नुकतेच जाहीर झाले असून सदर पेपर ची उत्तर पत्रिका तपासणी ही स्कॅनिंग द्वारे झालेली आहे त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी निदर्शनास आल्या असून सदर पेपर तपासणी प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरली आहे. त्या मुळे सदर पेपर तपासणी प्रक्रिया ही पुढील घेण्यात येणाऱ्या परीक्षा सत्रवेळी जुन्या पद्धतीने म्हणजेच स्कॅनिंग द्वारे तपासणी न करता करावी.
2) विद्यार्थ्यांना दोन पेक्षा जास्त उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी मागणी करण्याची परवानगी देण्यात यावी.
3) प्रोविजनल सर्टिफिकेट तात्काळ व डिग्री प्रमाणपत्र हे एक महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना देण्यात यावे.
4) इतर विद्यापीठाप्रमाणे पेपर पासिंग पद्धत ही पद्धतीने राबविण्यात यावी.
5) विद्यापीठात होऊ घातलेले क्रीडांगणास स्व.हिंदूरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे.
6) पुढील सत्रातील परीक्षा वेळेत घेऊन त्याचा तात्काळ निकाल लावण्यात यावा.
7) इतर विद्यापीठाच्या तुलनेत आपल्या विद्यापीठात गुणवत्ता पूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत, त्यामुळे विद्यापीठाची गुणवत्ता वाढीस मदत होईल. यासाठी तात्काळ आमलबजावणी करावी.
8) N+2 च्या नियमामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठ स्तरावरून तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तरी विनंती की, वरील सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन तात्काळ अमलबजावणी करावी, अन्यथा या पुढील काळात विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यानंसह शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी लहू गायकवाड, प्रकाश निळ, महेश भोसले, पांडुरंग घोलप, तुषार आवताडे, विजय काकडे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद