दत्त जयंती निमित्त ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी यांनी एक गरजु, गरीब महिलेला महीनाभराचा किराणा भरुन मदतीचा संदेश दिला ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था नेहमी आपले वेगवेगळ्या माध्यमातुन समाज सेवा करत असते आज दत्त जयंती निमित्त अशीच सेवा करण्याचे भाग्य समाजसेवा संस्थेला मिळाले.

सुभाष नगर भागातील एक फोन संस्थेला आला एक महिला आहे सौ. कुसुम फुटाणे या महिलेस मदतीची गरज आहे. संस्थेतील पदाधिकारी यांनी पहाणी केली आणि दत्त जयंतीनिमित्त त्या महिलेला आज पुर्ण एक महिना पुरेल असे किराणा भरुन दिला. याप्रसंगी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे अग्रवाल स्वीट होम चे मालक विशाल अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहल वाणी यांनी सांगीतले.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन