जागतिक योग दिन 2023, या निमित्ताने महाराष्ट्र विद्यालय बार्शी आणि संस्था संचलित कर्मवीर योगासन व प्राणायाम केंद्र बार्शी. यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आपल्या संस्थेच्या विद्यार्थिनी कु. हिमानी राऊत व स्नेहा वेदपाठक यांनी प्रोटोकॉलनुसार योग प्रात्यक्षिके व त्याचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार जयकुमार (बापू) शितोळे ,ट्रस्टी डॉ. सी. एस. मोरे, मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के. डी. उपमुख्याध्यापक सपताळे सर व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख किरण गाढवे उपस्थित होते याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहा वेदपाठक या विद्यार्थ्यांनीने “योगा विथ वंदेमातरम “या आगळ्यावेगळ्या विषयावर योगा प्रात्यक्षिक सादरीकरण केले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन