ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय बार्शी या संस्थेने 2025 या सालातील कॅलेंडरचे प्रकाशन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री अतुल जी कुलकर्णी साहेब यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जालिंदर नारकुल (डी वाय एस पी) साहेब माननीय राहुल मडावी (डी वाय एस पी) साहेब सोलापूर बार्शी शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे (पीआय) साहेब यांच्या हस्ते कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात सोहळा संपन्न झाला.
या कॅलेंडरमध्ये संस्थेने केलेल्या कामाचा आढावा त्यामध्ये टीबी पेशंटला मोफत आहार, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र, वृक्षारोपण वाटप भाविकांना अन्नदान वाटप, महिला सन्मान सोहळा, आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक कार्याचा आढावा यामध्ये आहे अनेकांनी या दिनदर्शिका प्रकाशनास शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अमोल भुरे साहेब स्वीय सहाय्यक सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी श्री स्वामी साहेब वाचक सोलापूर माननीय श्री धनाप्पा शेटे सहाय्यक पोलीस फौजदार माननीय सिंधुताई देशमुख ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी,सचिव विजय कुमार दिवाणजी सर, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, अजय तिवारी, सागर घंटे, सुनील नवले, गणेश सातारकर, सायरा मुल्ला मॅडम, रेखा विधाते, कोमल वाणी, सुजाता अंधारे, रेखा सरवदे, माधुरी वाणी, पुजा नवले,अनुसया अगलावे,चरण परदेशी, सादिक शेख या वेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान