Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
मित्राला शेअर करा

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमीत्त भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रांगोळी स्पर्धा पार पडल्या.

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांनी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त मुलींसाठी भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या ही रांगोळी स्पर्धैत लहान गट व मोठा गट असे दोन गट केले होते या रांगोळी स्पर्धेत मुलींनी सामाजीक संदेश देत असलेल्या पाणी वाचवा, संविधान संसंद, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्वच्छता अभियान, ओला कचरा सुका कचरा अशा व इतर कलात्मक रांगोळी काढून समाजिक संदेश दिला.

यासाठी परीक्षक म्हणुन सौ. निलम पाठक( शिक्षीका ) यांनी परीक्षक म्हनुन कामकाज पाहीले. या कार्यक्रमात महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या रांगोळी स्पर्धेसाठी मुलींनी भरघोस प्रतीसाद दिला यामध्ये लहान गटात 21 तर मोठ्या गटात 15 मुलींनी सहभागी घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगूळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, उमेश पंडीत,राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये कोमल वाणी, सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) ,रागीनी झेंडे, सारीका जाधवर, सिमा तांबारे, वैशाली ताई ढगे कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले, अर्चना कोठावळे, रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे, त्रिशाला मिसाळ, मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य आणि ओन्ली समाज सेवा समीतीचे सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचलन नागनाथ सोनवणे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संस्थापक श्री. संतोष गुळमिरे सर यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व शाळेचे शिक्षक श्री गणेश कदम यांनी सहकार्य केले याबद्दल ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी आभार मानले.