मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकावर सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षीही फाळणीच्या दिनाचे स्मरण चिरंतन राहण्यासाठी, फाळणीच्या भीषण स्मरण दिनाचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभाग आणि केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापू र रेल्वे स्थानक येथील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
सोलापूर रेल्वे स्थानकावर भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर मांडण्यात आलेले चित्र प्रदर्शन अत्यंत अभ्यासपूर्ण असून त्यांची सजावट, मजकूर अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे यांनी व्यक्त केले.
16 ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय हिबारे आदी उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ