शिवजन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
बार्शी; कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी मागील अनेक दिवसांपासून त्याचा परिणाम व्यापारावर, छोट्या व्यावसाईकांवर होता. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ हेच व्यापारी, छोटे व्यावसाईक आहेत.

याचाच विचार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन या वर्षीचा शिवजन्मोत्सव वर्गणीमुक्त पण मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुशांत चव्हाण यांनी सांगितले. श्री शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित युवा प्रतिष्ठान प्रत्येकवर्षी मोठ्या दिमाखात शिवजन्मोत्सव साजरा करते याचबरोबर दरवर्षी एका दुर्गाची हुबेहुब प्रतिकृती मंडळाचे सदस्य स्वतः तयार करतात तसेच रक्तदान शिबिर, शिवभोजन, वृक्ष लागवड, आदी उपक्रम मंडळामार्फत राबवले जातात. मागील दोन वर्षा पासून कोरोनाचे संकट आल्याने इतर कार्यक्रम स्थगित ठेवत रक्तदान शिबिर व इतर सामाजिक कार्यक्रमांना प्राधान्य देऊन समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जात आहेत.
सलाबाद प्रमाणे या वर्षीही १८ फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी ४ या वेळात हांडे गल्ली चौक, न्यायालय पार्कींग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ॲड. सुशांत चव्हाण सोबत युवा प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव अध्यक्ष दयानंद धुमाळ, उपाध्यक्ष दीपक बुजबळ , खजिनदार ज्ञानेश्वर वायकुळे, सचिव सत्यजित हांडे यांनी केले आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले